गडचांदूर न. प. चे सूत्र दुसऱ्यांदा महिलांच्या हाती

प्रभाग निहाय १७ सदस्यांचे आरक्षण सोडत जाहीर.
गडचांदूर/गणेश लोंढे:-
कोरपना तालुक्यात सर्वात मोठी गडचांदूर नगरपरिषदेची निवडणूक २०२० मध्ये होत असल्याचे संकेत असून यासाठी न.प.सभागृह येथे प्रभाग निहाय आरक्षण सोडत राजूरा उपविभागीय अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.प्रभाग क्र.१ ना.मा.प्र.(महिला) व सर्वसाधारण, प्रभाग क्र.२ अनु.जाती(महिला)व ना.मा.प्र.प्रभाग ३ ना.मा.प्र.(महिला)व सर्वसाधारण,प्रभाग ४ अनु.जाती(महिला)व सर्वसाधारण,प्रभाग ५ अनु.जमाती(महिला)व सर्वसाधारण, प्रभाग ६ ना.मा.प्र.(महिला)व सर्वसाधारण, प्रभाग ७ अनु.जाती व सर्वसाधारण (महिला),प्रभाग ८ अनु.जमाती(महिला)व ना.मा.प्र.आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.यासाठी मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी,प्रशासकीय अधिकारी डॉ.प्रकाश कोटेचा वरोरा,चरणदास शेडमाके प्रशासकीय अधिकारी न.प. गडचांदूर,प्रितेश मगरे निवडणूक विभाग प्रमुख आणि स्वप्नील पिदूरकर यांनी सहकार्य केले.नंदिनी आरकीलवार व नव्या कलगुरवार या दोन बालीकेच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आले.यावेळी न.प.अध्यक्षासह नगरसेवक विविध राजकीय पक्षांचे नेते,कार्यकर्ते,नागरिकांची उपस्थिती होती.आरक्षण विषयी हरकत व सुचना ७ ते १६ नोव्हेंबर पर्यंत घेता येणार असून हरकतीच्या सुचनावर सुनावणी २० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी घेतील अशी माहिती न.प.मुख्याधिकारी डॉ.शेळकी यांनी दिली आहे.