पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा तिव्र आंदोलन- यंग चांदा ब्रिगेडचा ईशारा

चंद्रपूर- इरई धरणात मुबलक पाणीसाठा असतांना मात्र चंद्रपूरकर पाण्याविना तहाणलेला आहे. हा चंद्रपूर च्या जनतेवर मोठा अन्याय होत असल्याची ओरड सतात्यांने होत होती. त्या करीता चंद्रपूरातील पाणी पूरवठा तात्काळ सूरळीत करान्याचे निवेदन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महानगर पालिकेचे आयूक्त संजय काकडे यांना देण्यात आले आहे. मुबलक पाणी साठा धरणात असतांना मनपाच्या दुर्लक्षित पणामुळे चंद्रपूर शहरांत अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरीकांना भीषण पाणीटंचाई भोगावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांन मध्ये रोष निर्माण झाला आहे. मनपा वर्षभराचा कर वसूल करतात पण पाणी मात्र १०० दिवसचं देतात अशी चर्चा नागरीक करीत आहेत. ही पाणी टंचाई निसर्ग निर्मित नसून मानव निर्मित आहे. याला सर्वस्वी पालिका प्रशासन जबाबदार असून या भीषण पाणी टंचाईला लवकरात लवकर दूर करा असे निवेदन मनपा आयुक्तांना देण्यात आले. अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा यंग चांदा ब्रिगेड च्या वतीने देण्यात आला. तेव्हा उपस्थित पदाधीकारी व नागरिकांना पाणी पुरवठा
लवकरात लवकर सुरळीत करू असे आश्वासन आयुक्त यांनी दिले. यावेळी दिपक दापके, दिपक पदमगीरवार, विनोद गोल्लजवार, विनोद अनंतवार, करणसिंह बैस, राशीद हुशैन, कलाकार मल्लारप, ताहिर शेख, वंदना हातगावकर, रुपा परसराम, कल्पना शिंदे, विदया ठाकरे, अस्मिता डोनारकर, दूर्गा वैरागडे, पुजा शेरकी, सुजाता बल्ली, नंदा पंधरे, आदिंची उपस्थिती होती….