चिमुकली रियाचा रुग्णालयात मृत्यू रुग्णवाहिका वेळेवर उपल्बध असल्यास वाचवता आले असते प्राण
राजुरा :- राजुरा येथील ग्रामीण रूग्णालयात जिवती तालुक्यातील टिटवी गावातील रिया मोतीराम मडावी २ वर्ष ६ महिने हीचा मृत्यू झाला. या घटने मूळे पुन्हा एकदा ग्रामीण रुग्णालयातील उपचारावर प्रशन निर्माण झाला आहे.
रिया ही आजारी असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे सकाळी भरती करून तीच्यावर उपचार करण्यात आला. परंतु प्रकृती खालावल्या मुळे तीला गडचांदूर येथे रेफर करण्यात आले होते. पालकांनी राजुरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. परंतू प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा रूग्णलय चंद्रपूर येथे डॉक्टरांनी रेफर केले. मात्र रुग्णवाहिका ताबडतोब उपलब्ध न झाल्यामुळे व प्रकृती अधिकच खालावल्याने चिमुकली रिया चा मृत्यू झाला होता.
आमदार सुभाष धोटे यांनी या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन वैद्यकीय अधिकारी डॉ. कुडमेथे यांना या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सुचना केल्या आणि मा. उपसंचालक, आरोग्य सेवा नागपूर व जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर यांच्याशी संपर्क करून सर्व प्रकारच्या अडचणी दूर करून राजुरा येथे एका महिन्याच्या आत अद्ययावत उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यात यावे, त्यासाठी आवश्यक असणारा अधिकारी वर्ग व अन्य स्टाफ देण्यात यावा, रुग्णवाहिका सेवा अद्ययावत करण्यात यावी, येथे असलेल्या साधन सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा लवकरात लवकर करून परिसरातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात यावे अशा सुचना केल्या.व रियाच्या पालकांना आर्थिक मदत केली.
या प्रसंगी त्यांच्या सोबत नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, नगरसेवक हरजितसिंग संधू, साईनाथ बतकमवार, पाटण येथील वाघू उईके यासह अनेकांची उपस्थिती होती.