समृध्द, शक्तीशाली व आनंदी भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण पाऊल केंद्रीय अर्थसंकल्पावर माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकारच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प समृध्द, शक्तीशाली व आनंदी भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
शेतीच्या उत्पन्नात 2022 पर्यंत दुपटीने वाढ करणे, 2024 पर्यंत प्रत्येकाला नळाचे पाणी देणे, शेतक-यांसाठी 15 लक्ष कोटी रू. शेती कर्जासाठी ठेवणे, प्रत्येक जिल्हयासाठी एक्सपोर्ट हब निर्माण करणे, शिक्षण क्षेत्रासाठी 99 हजार 300 कोटी रूपयांची तरतूद करणे, 112 जिल्हयांमध्ये आयुष्यमान भारत योजनेचा लाभ व्हावा यादृष्टीने हॉस्पीटल्स तयार करण्यासाठी योजना आखणे, कृषी विकासासाठी 16 सुत्रीय योजना करणे, आयकरामध्ये मोठी सुट देणे, बेरोजगारांसाठी विविध उपक्रम हे या अर्थसंकल्पाचे वैशिष्टय आहे. संस्कृती संवर्धनासाठी डिम्ड युनिवर्सिटी स्थापन करणे, पर्यटनाला चालना देण्यासाठी मोठी आर्थीक तरतूद करणे या सह सर्वच घटकांना न्याय देण्याची भूमी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातुन अर्थमंत्र्यांनी घेतली आहे, असेही आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
जागतीक मंदीच्या काळात सुध्दा या मंदीच्या सावटापासून आपल्या देशाला दूर ठेवण्याच्या दृष्टीने प्रगतीची कास धरणारा उत्तम अर्थसंकल्प या देशातील जनतेला दिल्याबददल मी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारमण यांचे विशेष अभिनंदन करतो,असे माजी अर्थमंत्री आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.