विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी भाजपकडून प्रा. डॉ. अशोक उईके यांचा उमेदवारी अर्ज

विधानसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीकडून यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. अशोक रामाजी उईके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील, आ. अतुल भातखळकर, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार आदी उपस्थित होते.
विधानसभेच्या रिक्त असलेल्या उपाध्यक्ष पदासाठी गुरुवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या रिक्त पदासाठी शनिवारी मतदान होणार असून, भाजपाकडून यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. उईके यांनी आपला उमेदवारी अर्ज पीठासीन अधिकारी राजेंद्र भागवत यांच्याकडे दाखल केला.
आ. उईके हे यवतमाळ जिह्यातील राळेगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, भाजपच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्री म्हणून काम पाहिले आहे.