महाराष्ट्र

२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करणार : डॉ.अमीर मुलाणी

************************************************सोलापूर : आयुष भारत आणि डॉ.सुहास शेवाळे योगाभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार असून त्या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती आयुष भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलानी यांनी दिली. आयुष भारतच्या वतीने योग दिवस साजरा करण्याच्या दृष्टीने डॉ.विश्वास फापाळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत डॉ.सुहास शेवाळे योगाभ्यासी मंडळ यांच्या सहकार्याने हा देशात हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. योगाचा प्रचार आणि प्रसारासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. डॉ.सुहास शेवाळे योगाभ्यासी मंडळ गेल्या 40 वर्षांपासून निशुल्क योग प्रचाराचे कार्य करीत आहे. अष्टांगयोगाचे अध्ययन आणि अध्यापन यासाठी निस्वार्थ भावनेने काम करणारे कार्यकर्ते तयार करण्याचे काम आयुष भारत वतीने केले जाते. देशभरात योगाभ्यासी मंडळाचे कार्यकर्ते योगाचा प्रचार आणि प्रसार करीत आहे. २१ जूनला सकाळी ६.३० वाजता देशात योग साधक व विविघ संस्थाच्या सहकार्याने सामूहिक योगासन प्रात्याक्षिकाचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये शरीर, संचालन, ताडासन, उत्काटसन, कटिचक्रासन, गोमुखासन, उष्ट्रासन, जानुशिरासन, कटिवक्रासन, योगनमनासन, सूर्यनमस्कार आणि नंतर प्राणायम होईल. अष्टांग योगाचे प्रात्याक्षिक यावेळी सादर करण्यात येईल. या शिवाय भारतातील विविध उद्यांनामध्ये सोशल डिस्टन्स ठेवून योगाचे वर्ग चालवले जातील, असेही माहिती डॉ.अमीर मुलाणी यांनी झूम मिटिंग मध्ये दिली. राष्ट्रीय सचिव डॉ.किशोर बोकील, डॉ.शाहीन मुलानी, डॉ.सारिका फापाळे, डॉ.नामदेव मोरे, डॉ.फैजान इनामदार, डॉ.फिरोज पठाण. ओझर्डे, डॉ.शब्बीर भाई पठाण. ओझर्डे, डॉ.प्रविण निचत, डॉ.सीता भिडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close