चंद्रपुर

*बंडू धोतरे यांच्या रामाला तलाव संवर्धनाच्या मागण्याला घेऊन अन्नत्याग सत्याग्रह सुरू*

*अनेक व्यक्ती संस्था-संघटनांचा पाठींबा*

चंद्रपूर:- आज सकाळी रामाळा तलाव संवर्धनाच्या विविध मागण्यांना घेऊन इको-प्रो चे बंडू धोतरे यांनी अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनास सुरुवात केली आहे.

रामाळा तलाव संवर्धनाच्या विविध विभागाकडे असलेल्या अन्य मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी यांचे मार्फत मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, संस्कृती मंत्री प्रल्हाद पटेल तसेच मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगर विकास मंत्री तथा संपर्क मंत्री एकनाथजी शिंदें यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी सदर निवेदने इको-प्रो चे नितीन बुरडकर, नितीन रामटेके, अब्दूल जावेद, धर्मेंद्र लुनावत यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांना दिले.
आज उपोषणाच्या पहिल्या दिवशी अनेक सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी भेट देत समर्थन व पाठींबा दिला. यात सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी अभय बडकेलवार, पर्यावरणवादी योगेश दुधपचारे, चंद्रपूर व्यापारी मंडळ चे अध्यक्ष रामजीवनसिह परमार, सचिव प्रभाकर मंत्री, किशोर जामदार, पाचदेउळ सचिव मुरलीधर झोडे, जंगल जरनी ग्रुप च्या चित्रा इंगोले, ऋतुजा मुन, नेत्रकमल संस्थेच्या नेत्रा इंगुलवर, प्रगती पडगेलवार, भद्रावती इको-प्रो चे किशोर खंडाळकर, अमोल दौलतकर यांनी भेट दिली.

आज सकाळी 10:00 वाजता रामाळा तलाव काठावर उपोषण मंडप उभारन्यात आले आहे. तलाव परिसरात इको-प्रो सदस्य कडून जनजागृती सुद्धा करण्यात येत आहे. मागण्यांबाबत गूगल अर्थ इमेज च्या साहाय्याने समस्या आणि उपाय आणि कुणाकडे मागण्या आहेत याबाबत सांगण्यात येत आहे.

*उपोषणाच्या पूर्व संध्येला इको-प्रो चि मोटरसायकल रॅली ठीकठिकाणी पत्रके वाटप*

काल संध्याकाळी इको-प्रो तर्फे शहरात मोटर सायकल रॅली काढण्यात आली. तसेच रामाळा तलाव परिसरात भानापेठ, गंजवार्ड, बगड खिडकी व आंचलेश्वर वॉर्ड परिसरात घरोघरी पत्रके वाटण्यात आली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close